इंग्रजी विषयाच्या हसऱ्या विनोदाची अखेर.एस. बी.भंडारे सर यांचे निधन.


इंग्रजी विषयाच्या हसऱ्या विनोदाची अखेर.एस. बी.भंडारे सर यांचे निधन.
वडूज दि 28 :-प्रा.अजय शेटे.
वडूज पेठेतील प्रतिथयश कापड उद्योजक कै.भास्करराव भंडारे यांचे चिरंजीव व हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज मधील इंग्रजी विषयाचे हाडाचे शिक्षक सुधाकर भास्कर भंडारे सर यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते वडूज शिक्षण विकास मंडळ चे विद्यमान संचालक पण होते.
हुतात्मा शाळा संकुलात त्यांनी इंग्रजी विषयाचे अध्यापन केले.इंग्रजी भाषेसारखा ' वाघिणीचे दूध ' असलेला विषय पण त्यांनी अतिशय विनोदी पद्धतीने हसत खेळत सर्व तुकडीच्या विद्यार्थ्यांना  सेवा निवृत्ती पर्यंत अतिशय तळमळीने शिकवला.शाळा संकुलाच्या जडण - घडणीत त्यांचे खूप मोठे योगदान राहिले आहे.ते चेअरमन गोविंद भंडारे व पर्यवेक्षिका सौ.एस. पी.जोशी मॅडम , डॉ.गिता कुलकर्णी यांचे वडील ,तर डॉ. प्रा. पी. डी.कुलकर्णी व प्रा.प्रमोद जोशी सर यांचे सासरे होत.
वडूज  मधील उद्योजक ,व्यापारी पेठकरी, दुकानदार व वडूज शिक्षण विकास मंडळ व शाळा संकुल स्टाफ यांच्यातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹 🙏.

Comments