शिवा संघटनेचे संस्थापक प्रा.मनोहर धोंडे सर यांची राज्यसभा किंवा विधानपरिषद सदस्य पदी निवड करावी. रविंद्र वाकडे.



शिवा संघटनेचे संस्थापक प्रा.मनोहर धोंडे सर यांची राज्यसभा किंवा विधानपरिषद सदस्य पदी निवड करावी.रविंद्र वाकडे.

सातारा, दि.27 - दिलिप  महाजन 

शिवा संघटनेचे संस्थापक प्रा.मनोहर धोंडे सर यांची राज्यसभा किंवा विधानपरिषद सदस्य पदी निवड करावी.रविंद्र वाकडे.

शिवा संघटनेचे संस्थापक मा. प्रा.मनोहर धोंडे सर यांची राज्यसभा अथवा विधान परिषद सदस्य म्हणून नेमणूक करावी .अशी आग्रही मागणी संघटनेच्या वतीने  मा. राष्ट्रपती महोदया, मा. पंतप्रधान, मा. गृहमंत्री, भारत सरकार मा. राज्यपाल महोदय, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी मागणी द्वारे आग्रहाने करण्यात आली आहे.या विषयानुसार  सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राष्ट्रीय स्तरावरील असामान्य योगदानाच्या आधारे आदरणीय प्रा. मनोहरजी धोंडे सर यांची राज्यसभा किंवा विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्याबाबत विनंती एकमुखाने करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेनुसार राज्यसभा किंवा विधानपरिषद साठी अशा व्यक्तींना संधी दिली जाते ज्यांनी सामाजिक कार्य, शिक्षण, विचार नेतृत्व व जनहिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय, निस्वार्थ व दीर्घकालीन योगदान दिले आहे. त्या अनुषंगाने आम्ही शिवा संघटना व महाराष्ट्रासह देशातील तमाम वीरशैव-लिंगायत, ओबीसी, बहुजन, दलित, आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने अत्यंत ठामपणे पुढील मागणी करीत आहोत की,

आदरणीय प्रा. मनोहरजी धोंडे सर यांची राज्यसभा  किंवा विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी,कारण ते शासनमान्य, लोकमान्य व राष्ट्रमान्य कार्य करत आहेत.शासनस्तरावर सन्मानित कार्य केल्या मुळे  महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा “महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार” त्यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाने  त्यांना प्रदान केला आहे.यावरून स्पष्ट होते की, त्यांचे कार्य शासनाने अधिकृतरित्या मान्य  करून  गौरविले त्यांना आहे. शैक्षणिक व बौद्धिक योगदान दाखवत त्यांनी  गोल्ड मेडल मिळवले आहे.ते एक आदर्श प्राध्यापक असून, विद्यार्थी चळवळीपासून सामाजिक नेतृत्व करत , शिक्षणातून समाज परिवर्तन करत आहेत. त्यांनी 40 वर्षांचे निस्वार्थ सामाजिक कार्य करताना, चार दशकांची अखंड सेवा कोणतेही पद नसताना प्रभावी कार्य करत , सर्व घटकांसाठी न्यायाचा लढा उभारला आहे. भव्य अशी संघटना उभारणी करत , शिवा संघटनेच्या देशभर 5,000 पेक्षा अधिक शाखा स्थापन केल्या आहेत. लाखो समाज बांधवांना एकत्रित करून सामाजिक शक्ती निर्माण करत संघटन, जनजागृती आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी विस्तार केला आहे. ऐतिहासिक व धोरणात्मक कामगिरी करत महाराष्ट्रात 25 जातींना आरक्षण मिळवून देण्यात योगदान दाखवत व  केंद्र शासन स्तरावर अंतिम टप्प्यात पाठपुरावा करत  विविध समाज घटकांच्या न्यायासाठी यशस्वी लढे दिले आहेत.महात्मा बसवेश्वर विचारांचा प्रसार करताना  महात्मा बसवेश्वर जयंतीला शासकीय मान्यता मिळवून देण्यात निर्णायक भूमिका निभावली आहे.तसेच त्यांचा  शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यास लावून, समता, बंधुता व लोकशाही मूल्यांचा प्रसार केला आहे.राष्ट्रीय स्तरावरील योगदान देत, संसद भवनात महात्मा बसवेश्वर पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

“अनुभव मंटप ' हिच जगातील पहिली लोकशाही” हा विचार मांडून,शासनाच्या निदर्शनास आणून दिले की, जगातील पहिल्या लोकशाहीचे  केंद्र विदेशी ' मेग्ना कार्टा ' नव्हे तर त्यांच्याही 100 वर्ष आधी  भारतातच महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून ती निर्माण केली होती.तसेच योजना व विकास कार्य यांची मागणी करत,आर्थिक विकास महामंडळ, मोक्षधाम योजना, कपीलधार तीर्थक्षेत्र विकास घडवून आणला आहे.शांततामय आंदोलनाचे आदर्श नेतृत्व, हिंसामुक्त आंदोलन, शासनाची मालमत्ता सुरक्षित ठेवत संघर्ष करत, न्यायालयीन व कायदेशीर लढ्यात यश मिळवले आहे. विकासात्मक दृष्टी ठेवत लोहा मार्गे नांदेड–लातूर रेल्वे मार्ग  कमी खर्चा सह अधिक उत्पन्न देत कसा होईल. याची मांडणी,स्वखर्चाने करत न्यायालयीन लढा देत  शासनाच्या निदर्शनास आणून देत मार्गाची मंजुरी मिळवली .त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे एक  निर्व्यसनी, निष्कलंक, चारित्र्यसंपन्न अभ्यासू, बुद्धिमान, दूरदृष्टी जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असलेला नेता म्हणून त्यांना समाज मान्यता आहे.

राज्यसभा किंवा  विधान परिषद सदस्य निकषांशी परिपूर्ण सुसंगती त्यांच्या मध्ये आहे.तरी त्यांना सदर राज्यसभा अथवा विधान परिषद सदस्य पदी एकमताने निवड करून सर्व समाज बांधवांना न्याय द्यावा.अशी आग्रही मागणी वीर शैव लिंगायत समाज व शिवा व इतर संघटना यांच्या वतीने एकमुखाने करण्यात आली आहे.

Comments