वडूज मध्ये श्री शनी देव मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन.

वडूज मध्ये श्री शनी देव मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन.
सातारा, दि.23 - प्रा.अजय शेटे.
वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथे पेडगाव रोड वर नव्याने उभारण्यात आलेल्या श्री शनी देव मंदिरात श्री शनी देव मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ सोमवार दि.23 ते बुधवार दि.25 मार्च अखेर स.7 ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
यासाठी दि.23 रोजी संध्या.4 ते रात्री 10 या वेळेत श्री शनी देवांची सुशोभित रथातून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.मंगळवार दि.24 रोजी पुण्याहवाचन, प्रायश्चित्त विधी,मूर्ती जलाधिवास दशविध स्नान,कुंभ स्नान,मूर्ती शय्या धिवास ई.कार्यक्रम होणार आहेत.बुधवार दि.25 रोजी अग्निस्थापना, यज्ञ अंगभूत देवता स्थापना, होमहवन, बलिदान पूर्णाहुती,मूर्ती प्राण प्रतिष्ठापना, कलशारोहण, महा अभिषेक,महाआरती, स.11.21 वा.मूर्ती स्थापना  व कलशारोहण व दु.3 ते रात्री 8 वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

कलशारोहण विधी श्री श्री प. पू.विठ्ठल स्वामी महाराज , वडगाव यांच्या हस्ते संपन्न होईल.तसेच पूजनाचार्य  वेदमूर्ती श्री . चित्तरंजन खटावकर ,वरूड हे असून या विधीस 21 जोडपी बसवून विधी करण्यात येणार आहे.
सदर मंदिर हे जुन्या काळातील प्रतिथयश कांदा - बटाटा व्यापारी कै.सुखदेव लक्ष्मण मंगरुळे यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले असून,त्याचा लोकार्पण सोहळा श्री.राहुल सुखदेव मंगरुळे ,द्वारा ओम ट्रेडिंग कंपनी,कांदा - बटाटा व्यापारी, सौ.ज्योती व चि.ओम व जय राहुल मंगरुळे यांच्या तर्फे करण्यात येत आहे.तरी सदर संधीचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर व्यवस्थापणा तर्फे करण्यात आले आहे.

Comments