आमदार मनोजदादा घोरपडे यांचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य याच्या निधीची विधानसभेत मागणी
आमदार मनोजदादा घोरपडे यांचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य याच्या निधीची विधानसभेत मागणी
कराड दि 17 :- प्रसाद वाकडे
आमदार मनोजदादा घोरपडे यांचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य याच्या निधीची विधानसभेत मागणी
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी आज विधानसभेमध्ये जिल्हा परिषद सुधारणा विधेयक बिलावर चर्चा करताना ज्याप्रमाणे विधानसभेच्या आमदारांना स्थानिक विकास निधी दिला जातो त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना स्थानिक विकास निधी देण्यात यावा अशी जोरदार मागणी केली. या निधीमुळे निवडून आलेल्या सदस्यांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये काम करता येईल व जनतेची विकास कामे तात्काळ करता येतील यासाठी हा निधी गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले.
त्याचबरोबर पंचायत समितीला स्वीकृत सदस्य घेण्यासाठी 20% ची मर्यादा आहे परंतु जिल्हा परिषद ला ती मर्यादा कमी आहे ती वाढून 20% करण्यात यावी अशी ही मागणी केली. नगरपालीकेला ज्या पद्धतीने स्वीकृत नगरसेवकांना एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता येतो त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यांना एक वर्षासाठी कार्यकाळ देण्यात यावा ज्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना या विकासाच्या संकल्पनेमध्ये सामील करून घेता येईल.
Comments
Post a Comment