श्री शिव योध्या प्रतिष्ठा न चे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे मा मंगेश चिवटे "एकनाथ हिरक आरोग्य वर्ष" अंतर्गत ,उंब्रजला शनिवारी महाआरोग्य शिबीर संपन्न.
श्री शिव योध्या प्रतिष्ठा न चे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे मा मंगेश चिवटे "एकनाथ हिरक आरोग्य वर्ष" अंतर्गत ,उंब्रजला शनिवारी महाआरोग्य शिबीर संपन्न.
उंब्रज दि 15 :- रवी वाकडे
श्री शिव योध्या प्रतिष्ठा न चे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे मा मंगेश चिवटे "एकनाथ हिरक आरोग्य वर्ष" अंतर्गत ,उंब्रजला शनिवारी महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मंगेश चिवटे यांनी केले आणि श्री शिव योध्या प्रतिष्ठान च्या कामाचे कौतुक केले यापुढे ही आम्ही आपल्या प्रतिष्ठान च्या आणि आपल्या भागातील गरजू रुग्णांच्या सेवे साठी योग्य ते सहकार्य करू असे आश्वासन या वेळी दिले,
उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या एकसष्ठी निमित्त 'एकनाथ हिरक आरोग्य वर्ष' अंतर्गत सौभाग्य मंगल कार्यालय काॅलेज रोड उंब्रज येथे शनिवार दि.१४ रोजी श्री शिवयोध्दा प्रतिष्ठाण यांच्या नियोजनाने सह्याद्री(मनीपाल) हाॅस्पीटल कराड,गांधी फाऊंडेशन,विघ्नहर्ता क्लिनीक,मोरया डेंटल क्लिनिक व यश लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने मोफत महाआरोग्य तपासणी व औषधोपचार व रक्तदान शिबिर संपन्न झाले.
शिवयोध्या प्रतिष्ठान च्या वतीने उंब्रज गावात सुरू असणारा आरोग्य सेवेचा महा यज्ञ असाच अविरत चालू राहावा शिव व्याख्याते किरण कोरे यांनी आपल्या मनोगत मध्ये प्रतिपादन केले.
शिबिरामध्ये ४१ रुग्णांची सर्व रक्त तपासणी मोफत करण्यात आली, मोतीबिंदू २५, तर १५० जणांची नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे देण्यात आले दंत तपासणी ५० रुग्ण, कान नाक घसा ४५ रुग्ण तर ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू यावेळी देण्यात आल्या सह्याद्री हॉस्पिटल कराड यांच्याकडून हृदय व व्हेरिकोज व्हेन्स तपासणी अशा एकूण १५५रुग्णांच्या तपासण्या यावेळी करण्यात आल्या शिबिराला ग्रामीण तसेच शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला'
शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या व जयवंतराव शेलार शिवसेना जिल्हाप्रमुख हस्ते करण्यात आले. यावेळी गांधी फौंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अविनाश काशिद सह्याद्री हॉस्पिटलचे प्रख्यात न्युरोसर्जन प्रसन्न पाटणकर मान्यवर उपस्थित होते श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान यांचे कार्य कौतुकास पात्र असून भविष्यातही त्यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन करून रुग्णांची सेवा करावी तसेच लागेल ते सहकार्य करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.मोरया क्लिनिकचे डॉ ऋषिकेश महापरळे विघ्नहर्ता क्लिनिक डॉ पूजा शिंदे - कदम व यश लॅबचे अमोल पवार यांचा सन्मान मान्यवर यांचे हस्ते करण्यात आला.या वेळी भिडे गुरुजी यांचे सहकारी अमोल देशमुख पत्रकार अविनाश काशीद डॉ पाटणकर किरण कोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री शिव योद्धा प्रतिष्ठापनचे अध्यक्ष संतोष बेडके उपाध्यक्ष शरद जाधव खजिनदार रणजीत कदम सचिव महेश जाधव,अमोल कांबळे, सचिन जाधव, कॅप्टन इंद्रजीत जाधव ,विक्रम सुर्यवंशी, शिवम बेडके, अभिषेक बेडके, संकेत यादव ,महेंद्र बेडके,कुलदीप मोहिते, रवींद्र वाकडे इत्यादी उपस्थित होते.



.jpg)


Comments
Post a Comment