वृत्तपत्र विक्रेते व पत्रकार यांच्या साठी लवकरच महामंडळे स्थापन करणार : मंत्री आशिष शेलार .


वृत्तपत्र विक्रेते व पत्रकार यांच्या साठी लवकरच महामंडळे स्थापन करणार : मंत्री आशिष शेलार .
सातारा, दि.13 - प्रा.अजय शेटे.
 सांस्कृतिक मंत्री मा.आशिष शेलार यांनी लवकरच वृत्तपत्र विक्रेते व पत्रकार यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळे लवकरच स्थापणार असल्याची माहिती विधान परिषदेत नुकतीच दिली.
विधान परिषद सदस्य मा.श्रीकांत भारतीय यांनी केलेल्या लक्षवेधी सूचनेकडे सरकार लवकरच गांभीर्याने पाहून चांगला निर्णय घेणार आहे.याचे सूतोवाच यावेळी विषद झाले.
पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांच्या अनेक समस्या आहेत. वृत्तपत्र विक्रेते,पत्रकार व वृत्तपत्र विद्या कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठी काही ठोस होणे आवश्यक आहे.कोरोना साथीत या क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या.त्यातून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. आचार्य बालकृष्ण जांभेकर यांच्या नावाने मागणी असणाऱ्या महामंडळाचे प्रस्ताव रखडले.वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्री - पुरुष अशा सर्वांच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे. गृह निर्माण योजने तर्फे घरे देणे.
सर्व ऋतुत काम करताना शारीरिक व मानसिक त्रास व आजार,अपघात विमा,प्रवास खर्च,निवृत्ती वेतन, प्रिंट व डिजीटल मिडिया यांचे कार्यक्षेत्र अशा अनेक गोष्टींकडे यावेळी विशेष लक्ष वेधले गेले.त्यामुळे पुढील अधिवेशनाच्या आत हे महामंडळ कार्यान्वित होईल याची काळजी घेतली जाणार आहे.वरील दोन्ही महामंडळे 10 ऑक्टोबर 2024 ला स्थापन करण्याचा निर्णय मंत्री मंडळाने घेतला असून,विविध खात्यांच्या समन्वय करण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यामुळे लवकरच ही महामंडळे स्थापन होतील .अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी दिली.

Comments