स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टी स्वप्नातील कराड उत्तर सुजलाम सुफलाम करण्यात यश - आमदार मनोज घोरपडे


स्व.यशवंतराव चव्हाण  यांच्या दूरदृष्टी स्वप्नातील कराड उत्तर सुजलाम सुफलाम करण्यात यश - आमदार मनोज घोरपडे 

 स्व यशवंतराव चव्हाण यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त घोरपडे यांनी वाहिली प्रीतीसंगमावर आदरांजली
कराड दि 12 :- प्रसाद वाकडे 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज 12 मार्च रोजी 113 वी जयंती आहे. त्यानिमित्त  कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज दादा घोरपडे   यांनी प्रीतिसंगावरील समाधीस्थळी आदरांजली वाहिली .  
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी कृषी, सहकार आणि औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून आधुनिक महाराष्ट्राचा पाया घातला. महाराष्ट्राचा समतोल विकास साधला. म्हणूनच त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि लोकनेते म्हटले जाते. देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण, अर्थ आणि गृहमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय होती.

 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या दूरदृष्टीतील असलेली विविध विकास कामे पूर्णत्वाच्या मार्गास जात असून विशेषता धनगरवाडी हणबरवाडी  योजना हिंगोली पाल उपसा सिंचन योजना यासह विविध रस्त्यांची कामे पूर्णत्वास नेण्यात यश आला असल्याचे मत यावेळी घोरपडे यांनी प्रीतीसंगमावर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

Comments