"एकनाथ हिरक आरोग्य वर्ष" अंतर्गत उंब्रजला शनिवारी महाआरोग्य शिबीर,पालकमंत्री ना.शंभुराज देसाई,मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती .
"एकनाथ हिरक आरोग्य वर्ष" अंतर्गत उंब्रजला शनिवारी महाआरोग्य शिबीर,पालकमंत्री ना.शंभुराज देसाई,मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती .
उंब्रज,ता.१०:- रवी वाकडे
उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या एकसष्ठी निमित्त 'एकनाथ हिरक आरोग्य वर्ष' अंतर्गत सौभाग्य मंगल कार्यालय काॅलेज रोड उंब्रज ता.कराड येथे शनिवार ता.१४ मार्च रोजी स.१० वा. श्रीशिवयोध्दा प्रतिष्ठाण यांच्या नियोजनाने सह्याद्री(मनीपाल) हाॅस्पीटल कराड,गांधी फाऊंडेशन,विघ्नहर्ता क्लिनीक,मोरया डेंटल क्लिनिक व यश लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने
मोफत महाआरोग्य तपासणी व औषधोपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीशिवयोध्दा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बेडके यांनी दिली.
उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्ष 'एकनाथ हिरक आरोग्य वर्ष' म्हणुन साजरे होत असुन संपुर्ण महाराष्ट्रात मोफत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात असुन उंब्रज येथील आरोग्य शिबिरात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार,मोफत चष्मा वाटप व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर,कान- नाक-घसा,दंत चिकित्सा तसेच हदयविकार रुग्णांसाठी मोफत ईसीजी,टुडी ईको,अॅजीओग्राफी व त्यानंतर मोफत शस्त्रक्रिया,वंध्यत्व व व्हेरीकोज व्हेन निदान उपचार मोफत करण्यात येणार असुन रक्तदान शिबिरांतर्गत प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
महाआरोग्य शिबिरास पर्यटन व खनिजकर्म मंत्री तथा पालकमंत्री सातारा ना.शंभुराज देसाई,उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख मंगेशजी चिवटे,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,गांधी फाऊंडेशन अध्यक्ष धिरज गांधी,श्रीस्वामी समर्थ सेवाभावी संस्था अध्यक्ष अविनाश काशीद यांची प्रमुख उपस्थिती राहणार असुन तरी सातारा जिल्हातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीशिवयोध्दा प्रतिष्ठाण उपाध्यक्ष शरद जाधव,खजिनदार रणजित कदम यांनी केले आहे.
Comments
Post a Comment