राजकीय उदासीनते मुळेच उंब्रज ची बाजारपेठ नेस्तनाबूत ? राजकीय उदासीनतेचा बळी उंब्रज बाजारपेठ.
उंब्रज दि ०१ :- रवींद्र वाकडे
राजकीय उदासीनतेमुळे उंब्रज बाजारपेठवर 10 वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने गाढवांचा नांगर फिरवला गेला, आणि व्यापाऱ्यांना बाजारपेठेमधून बाहेर काढले गेले उंब्रज करांच्या कपाळावरील कधीच न भरून येणारी भळभळनारी जखम निर्माण केली गेली, आणि आज अखेर त्यावर कोणताही प्रशासनाकडून उपाय केला गेला नाही,ही व्यापाऱ्यांची खंत आहे.
उंब्रज हे दळणवळणासाठी वाहतुकीसाठी उद्योग धंद्यासाठी हायवेवरील प्रमुख केंद्र मानले जाते समृद्ध असे हे उंब्रज गाव दहा वर्षांपूर्वी गजबजलेली अशी बाजारपेठ होती मात्र या उंब्रज च्या बाजारपेठेवर प्रशासनाच्या वतीने गाढवांचा नांगर फिरवून गावाच न भरून येणार नुकसान केलं गेलं आहे. बाजारपेठ मधील सुमारे ५० दुकान गाळे पाडण्यात आले अनेक गाड्यांचे स्थलांतर करण्यात आले, या घटनेला आज १ मार्च २०२६ रोजी १० वर्ष पूर्ण झाली आहेत अनेक व्यापारी देशोधडीला लागले मात्र याची दखल येत्या 10 वर्षात या विभागातील कोणत्याही नेत्यांनी आज अखेर पर्यंत घेतली गेली नाही कोणताही ठोस निर्णय व्यापाऱ्यांच्या बाजूने घेतला गेला नाही. अथवा याच ठिकाणी भव्यदिव्य असे व्यापारी संकुल करण्यात यावे असा कोणताही विचार केला नाही आणि ही खदखद येत्या १० वर्षापासून व्यापाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे आणि भविष्यातही ते होईल अशी अपेक्षा व्यापारी व नागरिकांना वाटत नाही.
या घटनेनंतर आज 10 वर्षे झाली तरी उंब्रज कर बांधवांच्या व्यापाऱ्यांच्या कपाळावर न भरून येणारी जखम अजूनही तशीच आहे,अश्वथाम्या च्या जखमी सारखीच अजून किती वर्षे अशीच राहणार असा प्रश्न उंब्रज कर यांना अजून भेडसावत आहे,लवकरच उंब्रज मध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर झाले आहे आणि लवकरच उंब्रज हे गाव नगर पंचायत होईल तसेच येथे कराड च्या धर्तीवर सेंगमेंटल उड्डाण पूल ही मंजूर झाला आणि लवकरच त्याचे काम ही सुरू होईल आणि या बदलत चाललेल्या विकासा सोबत त्या निमित्ताने तर निदान 10 वर्षाच्या नंतर तर उंब्रज च्या बाजार पेठेला न्याय मिळणार काय उंब्रज च्या व्यापारी बांधवांचे स्वप्न होते की छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल अशी भव्यदिव्य असे व्यापारी संकुल येथे निर्माण होईल आणि उंब्रज च्या बाजार पेठेला पुन्हा वैभव प्राप्त होईल अशी मागणी व्यापारी आणि ग्रामस्थ करत आहेत.


.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment