सातारा जिल्हा मोटार सायकल मेकॅनिकल गॅरेज ओनर असोसिशनचा 14 व्या वर्धापन दिना निमित्त विभागीय मेकॅनिकल मेळावा.





 सातारा जिल्हा मोटार सायकल मेकॅनिकल गॅरेज ओनर असोसिशनचा 14 व्या वर्धापन दिना निमित्त विभागीय मेकॅनिकल मेळावा.

           

सातारा, दि.8 - रविंद्र वाकडे.

मोटार सायकल मेकॅनिकल गॅरेज ओनर असोसिशन ,सातारा जिल्हा यांच्या वतीने शुक्रवार दि.13 मार्च 2026 रोजी , कला वाणिज्य महाविद्यालय , कोटेश्वर ग्राउंड समोर,सातारा येथे  स.9 ते सायं.6.30 या वेळेत 14 व्या वर्धापन दिना निमित्त विभागीय मेकॅनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन खा. श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले व महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून साताऱ्याचे नगराध्यक्ष मा.अमोल मोहिते, जिल्हा पोलीस अधीक्षक मा.तुषार दोशी,उपनगराध्यक्ष मा. दत्तात्रय बनकर, शाहूपुरी पोलीस स्टेशन चे पो. नि. मा.अभिजित यादव, मा.उप नगराध्यक्ष जयंतराव चव्हाण, मा.नगराध्यक्षा व महेश ॲटो पार्टसच्या संचालिका मा.सौ.वैशाली महेश महामुने, पतोडिया डायरेक्टर ग्रुप चे मा. जितेश पतोडिया ,उद्योजक व मा. पैलवान निलेश जाधव पाटील, एम.आर.पटेल कोल्हापूर चे मा. निकुल जगदिशभाई पटेल हे उपस्थित राहणार आहेत.


                                  

या कार्यक्रमात स.9 ते 10.30 या वेळेत उपस्थित मेकॅनिक ची नोंदणी, चहा, नाश्ता व स्टॉल व्हिजिट होणार आहे. स.10.30 ते 11.30 वर्धापन दिन उद्घाटन सोहळा,11.30 ते दु.12.30 मान्यवरांचे स्वागत व मार्गदर्शन, दु.12.30 ते 1.30 देवमाणूस, चंदा तुझ्यात जीव रंगला, वहिनी साहेब, रानबाजार फेम व अप्सरा आली विजेती अभिनेत्री माधुरी पवार  यांचा कार्यक्रम, दु.1.30 ते 3.30 भोजन व स्टॉल व्हिजिट, दु.3.30 ते सायं.5.30 विरेंद्र केंजळे प्रस्तुत 'साज ' हा मराठी - हिंदी जुन्या - नव्या गीतांची सुरेल मैफील , सायं.5.30 ते 6.30 महिला सन्मान गिफ्ट चे वाटप या प्रमाणे संपूर्ण दिवसभर कार्यक्रम होणार आहे.

तरी सदर कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments