सातारा जिल्हा मोटार सायकल मेकॅनिकल गॅरेज ओनर असोसिशनचा 14 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित मेकॅनिकल मेळावा हजारोच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला सुमारे 2 हजार च्या वर गॅरेज मालक आणि मेकॅनिकल बांधवांची उपस्थिती.
सातारा जिल्हा मोटार सायकल मेकॅनिकल गॅरेज ओनर असोसिशनचा 14 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित मेकॅनिकल मेळावा हजारोच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला सुमारे 2 हजार च्या वर गॅरेज मालक आणि मेकॅनिकल बांधवांची उपस्थिती.
सातारा, दि.13- रविंद्र वाकडे.
मोटार सायकल मेकॅनिकल गॅरेज ओनर असोसिशन ,सातारा जिल्हा यांच्या वतीने आयोजित 14 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दि.13 मार्च 2026 रोजी सातारा येथे विभागीय मेकॅनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले हा मेळावा हजारोच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला, सुमारे 2 हजार च्या वर गॅरेज मालक आणि मेकॅनिकल बांधवांची उपस्थिती होती तर सुमारे 50 विविध कंपन्यांनी आपल्या प्रोडक्ट चे स्टोल लावले होते, त्याच बरोबर हिरो ,सुझुकी, यामाहा ,बुलेट अशा नामवंत कंपन्यांनी ही आपली हजेरी लावली होती या मुळे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मेकॅनिकल आणि गॅरेज मालक यांना नवंनविन गाड्या आणि साहित्य यांची माहिती मिळाली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सातारा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र शिंदे , मा.नगराध्यक्षा व महेश ॲटो पार्टसच्या संचालिका मा.सौ.वैशाली महेश महामुने,
यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजेंद्र शिंदे, राजेश महामुने ,नितीन किरवे, मनोज पवार महेश गंधाले प्रमोद देवरे, विकास गुजर, आणि सर्व पदाअधिकारी उपस्थित होते त्याच बरोबर सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून ही 2 हजार च्या पेक्षा ही जास्त संख्येने मेकॅनिकल आपल्या कुटूंबा सह उपस्थित होते.
या वेळी संघटनेच्या वतीने सर्व उपस्थित बांधवांच्या साठी जेवण आणि करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . ग्रामीण भागातून आलेल्या मेकॅनिकल बांधवां या वेळी सत्कार करण्यात आला.





.jpg)
Comments
Post a Comment