कराड उत्तर मधील धार्मिक स्थळांसाठी 12.35 कोटी मंजूर,आमदार मनोजदादा घोरपडे.


कराड उत्तर मधील धार्मिक स्थळांसाठी 12.35 कोटी मंजूर,आमदार मनोजदादा घोरपडे.
कराड दि 29 :-रवी वाकडे
कराड उत्तर मधील धार्मिक स्थळांसाठी 12.35 कोटी मंजूर,आमदार मनोजदादा घोरपडे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघाला मोठा धार्मिक वारसा लाभलेला असून यामध्ये खंडोबाची पाली, भूषणगड, सदाशिवगड, गिरजाशंकरवाडी, तीर्थक्षेत्र पाडळी इत्यादी अनेक मोठी धार्मिक स्थळे आहेत. या ठिकाणी दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात.यात्रा काळामध्ये लाखो भाविक या ठिकाणी यात्रेला हजेरी लावत असतात. येणाऱ्या भाविकांना उच्च प्रतीच्या  सुख सुविधा मिळाव्या त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी व धार्मिक स्थळांचा विकास व्हावा यासाठी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न चालू असतात
                                श्री क्षेत्र खंडोबाची पाली या ठिकाणी तीन कोटीचा निधी मंजूर झाला असून दोन कोटींचा निधी लवकरच मंजूर करण्यात येईल  आमदार मनोज दादा घोरपडे
 
 ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार  गोरे साहेब यांच्या माध्यमातून कराड उत्तर मधील धार्मिक स्थळे विकसित करण्यासाठी व येणाऱ्या भाविकांना भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी 12.35 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.
यामध्ये गिरजाशंकरवाडी व तीर्थक्षेत्र पडळी या गावचे क वर्ग देवस्थान असणारे ब वर्ग देवस्थान मध्ये मंजूर करून निधी प्राप्त झाला आहे.
     यामध्ये पाली 3 कोटी गिरजाशंकरवाडी 5 कोटी व तीर्थक्षेत्र पाडळी 4 कोटी 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. या निधीमुळे येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवास व धार्मिक स्थळांचा विकास होणार असून या ठिकाणी भाविकांची व पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार असून  ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यास चालला मिळणार आहे.
 

Comments