म. फुले प्राथमिक शाळेत अभिरूप आनंद बाजाराचे आयोजन. योग्य वयात आर्थिक व्यवहार आणि मूल्य समजले तर प्रभावी व्यक्तिमत्त्व विकास शक्य - सतीश शेटे.
म. फुले प्राथमिक शाळेत अभिरूप आनंद बाजाराचे आयोजन. योग्य वयात आर्थिक व्यवहार आणि मूल्य समजले तर प्रभावी व्यक्तिमत्त्व विकास शक्य - सतीश शेटे.

सातारा, दि.26 - प्रा.अजय शेटे.
वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित म.फुले प्राथमिक शाळे मध्ये अभिरूप आनंद बाजाराचे आयोजन मंगळवार, दि.24 रोजी स.8 ते 12 या वेळेत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन पाहून,संचालक सतीश शेटे म्हणाले की, विद्यार्थ्यांना योग्य वयात व्यवहाराचे धडे आणि पैशांचे मूल्य समजले तर त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास अतिशय प्रभावीपणे घडतो.या वेळी त्यांच्या समवेत चेअरमन गोविंद भंडारे, व्हाइस चेअरमन विजय म्हामणे, स्कूल कमिटी अध्यक्ष संतोष कांबळे,संचालक अशोक भंडारे,संजय येवले, प्राचार्या बी.एस.माने मॅडम,पर्यवेक्षिका एस . पी.जोशी मॅडम,पर्यवेक्षक जे.टी.धुळप,आर.एस.जगदाळे, डी .एम. लहारे सर यांनीही या आनंदी बाल बाजाराचे कौतुक केले.
मुख्याध्यापिका शीतल शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केलेल्या या आनंद बाजारात विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी पालेभाज्या,फळभाज्या,फळे यांचा दर्जा,किंमत,आर्थिक देवाण घेवाण यांचे मूल्य अतिशय लहान वयात शिकण्याचा प्रयत्न केला.या बाजारात गोळ्या,बिस्किटे, चिरमुरे,फुटाणे,शेंगदाणे अशा चिमण खाऊ बरोबरच मसाला लाही,भडंग, भेळ,ढोकळा,वडापाव,थालीपीठ,दही,उसळ, सुरळी वड्या,मसाला भात, मंचुरियन,कचोरी, समोसा, ई.चवदार खाद्य पदार्थ व मसाला दूध,लस्सी,चहा अशी लज्जतदार पेये यांची पण विक्री बाल व्यापारी चमुनी मोठ्या आनंदात व उत्साहात करून जीवनोपयोगी खरेदी - विक्री कौशल्य समजून घेतले.मालाची खरेदी,विक्री ,नफा ,ग्राहक मागणी आणि शिल्लक माल , टिकावू व टाकावू नियोजन,रोख व्यवहार,खरे व चांगले चलन मूल्य कौशल्य समजून घेतले.
हा आनंद बाजार यशस्वी करण्यासाठी खराडे ,देशपांडे, लोहार ,खाडे,जाधव,पवार मॅडम तसेच गवळी व पवार सर , म्हामणे, यादव, टाकणे,पाटोळे मावशी ,पालक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
या आनंद बाजारात संस्था संचालक,सदस्य ,शालेय विद्यार्थी -विद्यार्थीनी,शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी स्टाफ,पालक वर्ग व इतर स्त्री - पुरुष ग्राहक वर्ग यांनी मोठ्या प्रमाणावर वस्तू व खाद्य पदार्थ खरेदी करून ,विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला कौशल्य व गुणांचे विशेष कौतुक केले.


Comments
Post a Comment