उंब्रज उड्डाणं पुलाचे काम चालू करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता उंब्रजसाठी ₹१३३.४५ कोटींची तरतूद, आमदार मनोजदादा घोरपडे , महाराष्ट्रातील दोन प्रोजेक्ट्सचा समावेश .
उंब्रज उड्डाणं पुलाचे काम चालू करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता उंब्रजसाठी ₹१३३.४५ कोटींची तरतूद, आमदार मनोजदादा घोरपडे , महाराष्ट्रातील दोन प्रोजेक्ट्सचा समावेश .
उंब्रज दि 28 :- रवींद्र वाकडे
उंब्रज उड्डाणं पुलाचे काम चालू करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता उंब्रजसाठी ₹१३३.४५ कोटींची तरतूद, आमदार मनोजदादा घोरपडे यांची माहिती, महाराष्ट्रातील दोन प्रोजेक्ट्सचा समावेश .
उंब्रजच्या विकासाचा ऐतिहासिक क्षण अखेर उजाडला आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे बहुचर्चित उंब्रज उड्डाणपुलाच्या १०८ कोटींच्या निविदेची घोषणा ३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली होती तर आज ₹१३३.४५ कोटींची तरतूद करण्यात आली . अनेक वर्षांच्या संघर्षानंतर उंब्रजकरांचे स्वप्न साकार झाले असून, गावात आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग देणारा
महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन
गडकरी यांनी राज्यातील दोन एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी एकूण ₹२५८.९९ कोटींच्या निधीस
मंजुरी दिली आहे. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथे पारदर्शक उड्डाण पुलाचे
काम चालू करण्याचा विषय समाविष्ट आहे. उंब्रज येथील या प्रकल्पासाठी ₹१३३.४५ कोटींची तरतूद
करण्यात आली असून,
त्यामध्ये स्लिप रोड व सर्व्हिस रोडचाही समावेश आहे. कागल
ते सातारा या सहापदरीकरण प्रकल्पांतर्गत उंब्रज शहरातून जाणाऱ्या महामार्गावर
वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि
अपघातांचा धोका लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी फ्लायओव्हरची मागणी केली होती.
अखेर १३ फेब्रुवारी २०२६ रोजी या ब्रिज सेगमेंटल पूलाच्या ट्रेंडरला मंजुरी
मिळाली. महाराष्ट्रातील दोन प्रोजेक्ट्सचा समावेश
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
एकूण प्रकल्प खर्च: ₹१४०.९१ कोटी
अंदाजित बांधकाम खर्च: ₹१०७.९८ कोटी
पूर्णत्व कालावधी: २ वर्षे
देखभाल कालावधी: १० वर्षे
एकूण लांबी: १३०० मीटर (दोन्ही रॅम्पसह)
मुख्य उंच पूल (Elevated Structure): ८१० मीटर
रॅम्प: ४९० मीटर (दोन्ही बाजूंनी)
उंब्रज शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन हा एलिव्हेटेड
कॉरिडॉर महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
आर्थिक आणि वाहतूक कोंडीच्या दृष्टीने मोठा फायदा उंब्रज
येथील उड्डाणपूलामुळे शहरातील वाहतूक कोंडी पूर्णपणे बंद होणार असून स्थानिक
व्यापारी व नागरिकांना याचा फायदा होणार
आहे त्याचबरोबर चाफळ उंब्रज मसूर हा सुद्धा रोड पूर्णत्वास आलेल्या असून उंब्रज
शहरापुरता चारपदरी काँक्रिटीकरण होणार असून उंब्रजच्या वैभवात भर पडून वाहतूक
कोंडी पासून सर्व उंब्रजकरांची सुटका होणार आहे.
लवकरच प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ
नोव्हेंबर महिन्यात जाहीर झालेल्या निविदेनुसार केंद्राच्या नियमाप्रमाणे
संबंधित सेगमेंटल पुलाच्या कामाला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळवून
वर्क ऑर्डर मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे टेंडर गोपनियतेच्या नियमानुसार
लवकरच संबंधित ठेकेदारचे नाव जाहीर होऊन काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे
याबाबतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा ट्विट केले आहे
उंब्रज
गावाची बाजारपेठ दोन भागांत विभागली गेली होती. यामुळे आर्थिक घसरण, वाहतुकीतील
अडचणी,
अपघातांची
भीती आणि व्यापारावर आलेले संकट – या सर्व समस्यांनी गावाला
जखडून ठेवले होते. याच वेदनेला उत्तर देण्यासाठी आमदार घोरपडे यांनी उड्डाणपुलाचा
मुद्दा आपल्या कार्ययोजनेच्या केंद्रस्थानी ठेवला.
त्यांनी
सातत्याने केंद्र आणि राज्य सरकार दरम्यान धावपळ केली, केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत अनेक बैठक घेतल्या आणि अखेर उंब्रजकरांचा दीर्घ
संघर्ष फळाला आला



Comments
Post a Comment