भाजप किसान मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी रामकृष्ण वेताळ.

 
भाजप किसान मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी रामकृष्ण वेताळ.
ओगलेवाडी दि 25 :- दिलीप महाजन
 कराड उत्तर चे युवा नेते आणि उत्तर चा स्वाभिमान अशी ओळख निर्माण झालेली रामकृष्ण वेताळ यांची भाजप किसान मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतची घोषणा नुकतीच केली रामकृष्ण वेताळ यांनी या अगोदर भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस सातारा जिल्हा उपाध्यक्ष कराड शेती उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक अशा विविध पदावर काम केले आहे या सर्व ठिकाणी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे त्यांची पक्षाने दखल घेतली आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पक्ष बांधण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम हे वरिष्ठांना चांगलेच ज्ञात असल्याने राज्य पातळीवरील संघटनांमध्ये त्यांना चढत्या क्रमाने काम करण्याची संधी मिळत आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अन्याय होत असल्याने त्यांनी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून त्यांना पक्ष संघटनेतून निष्ठाशीत केल्याचे पत्र सोशल मीडियावर फिरत होते,
 मात्र या निवडीमुळे राज्य पातळीवरील नेत्यांमध्ये असलेली त्यांची पकड दिसून येत आहे त्यांच्या एवढे मुळे शेतकरी आणि शेतीसंबंधीच्या समस्या शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी एक प्रामाणिक मनुष्य संघटनेला लाभलेला आहे,

 शेती आणि शेतकरी समृद्धीसाठी काम करणार किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हे पद देऊन वरिष्ठाने दाखवलेला विश्वास सार्थ करणार आहे त्याचप्रमाणे शेती आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहणार आहे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे कार्य हे संपूर्ण देशासाठी आदर्शवत राहील असे कार्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे रामकृष्ण वेताळ प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा.

 यामुळे किसान मोर्चा अतिशय प्रभावी काम करून शेतकऱ्यांनी शेतीसाठी फायदेशीर निर्णय घेण्यासाठी शासनास मार्गदर्शन करेल या निवडीबद्दल रामकृष्ण वेताळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नामदार चंद्रशेखर बावनकुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सातारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले या निवडीमुळे कराड उत्तर मतदार संघामधील रामकृष्ण वेताळ प्रेमी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .

Comments