टायनी हार्ट प्री स्कूल चा स्नेहसंमेलन सोहळा दिमाखात संपन्न.


टायनी हार्ट प्री स्कूल चा स्नेहसंमेलन सोहळा दिमाखात संपन्न.
पुणे दि 04  :- मिलिंदा पवार
लोणी काळभोर लावण्यस्विहा बहुउद्देशीय सामाजिक , शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य संचलित टायनी हार्ट प्री स्कूल चा स्नेहसंमेलन सोहळा  नुकतेच लोणी काळभोर येथे अतिशय उत्साहात आणि दिमाखात पार पडला.
स्नेहसंमेलनाचा प्रमुख विषय होता 'साज महाराष्ट्राचा सोहळा सण आणि संस्कृतीचा ' या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रीयन सर्व सणांचे डेकोरेशन व त्या सणांनुसार लहान मुलांची गाणी व नृत्य बसवले होते हे वेगळेपण पाहून सर्व पाहुण्यांनी मुलांचे व शिक्षकांचे खूपच कौतुक केले .

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नागेश काळभोर सरपंच लोणी काळभोर,अर्चना धुरदेव प्राचार्या महावीर निवासी मतिमंद महाविद्यालय लोणी काळभोर ,वस्ताद प्रमोद पाटील संस्थापक क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा,तसेच धनश्री नायर बालवाडी पर्यवेक्षिका,पत्रकार मिलिंद लोहार सचिव लावण्यस्विहा बहुउद्देशीय सामाजिक संस्था हे उपस्थित होते.
सेलेब्रिया हॉल इथे हा स्नेहसंमेलन सोहळा अतिशय दिमाखात पार पडला,
 टायनी हार्ट प्री-स्कूलच्या संस्थांपिका सौ.प्रियांका ढम 
प्राचार्य तृप्ती पिसाळ 
शिक्षिका सौ.स्नेहल खेडेकर 
सौ. प्राजक्ता काळभोर  यांनी मुलांची खूपच सुंदर तयारी करून घेतली असल्यामुळे अतिशय सुंदर नृत्य मुलांनी केले तसेच शिवजन्मोत्सव सोहळ्याने तर अंगावर रोमांच उभा केला असे पाहुण्यांनी मत व्यक्त केले अतिशय शिस्तबद्ध व रेखीव असा हा कार्यक्रम पार पडला यासाठी सूत्रसंचालन सर्व शिक्षकांनी केले व कार्यक्रम उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक सदस्य पालक व मुले यांनी मदत केली .तसेच आभार श्री. अनुप ढम यांनी व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments