कराड उत्तरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उंब्रज, जिल्हा परिषद गटांतील निवडणूक प्रचाराचा शुभारंभ राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न,


कराड उत्तरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या  उंब्रज, जिल्हा परिषद गटांतील  निवडणूक प्रचाराचा शुभारंभ राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न,
उंब्रज दि  02 :-रवी वाकडे
 कराड उत्तरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या  उंब्रज, जिल्हा परिषद गटांतील  निवडणूक प्रचाराचा शुभारंभ राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न,
कराड उत्तरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाल, उंब्रज, चरेगाव, मसूर आणि कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटांतील व त्याअंतर्गत सर्व पंचायत समिती गणातील सर्व अधिकृत उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय श्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते, आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाल ता.कराड येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा म्हाळसाकांताच्या साक्षीने श्रीफळ वाढवून करण्यात आला.*
*प्रारंभी हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.*

*तसेच राज्याचे लोकप्रिय, अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, दोन मिनिट उभे राहून आणि स्तब्धता पाळून अभिवादन करण्यात आले.*

*याप्रसंगी स्वर्गीय बाबासाहेब साळुंखे (चोरेकर) यांचे वारसदार मा.श्री बाळासाहेब साळुंखे (चोरेकर), दत्तात्रय साळुंखे, धैर्यशील साळुंखे, प्रसाद साळुंखे, निखिल साळुंखे यांनी,आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा असल्याचे सांगून तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून मताधिक्य देणार अशी ग्वाही दिली.*
*यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी सहकार व पणन मंत्री माननीय श्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, या मतदारसंघाने नेहमीच स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या विचारांचा वारसा जोपासला आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने राज्याच्या मंत्रिपदावर काम करत असताना कराड उत्तरसह जिल्ह्याचा विकासात्मक कायापालट केला. ते करत असताना हणबरवाडी-धनगरवाडी जलसिंचन योजना, तारळी- पाल जलसिंचन योजना उभारणी कामी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मतदार संघामध्ये कोट्यावधीची विकास कामे केली, विकास कामात कधीही राजकारण केले नाही किंवा गटातटाचे राजकारण केले नाही. सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे सांगून बाळासाहेब साळुंखे चोरेकर आणि त्यांचे सर्व कुटुंबीय सहकारी मित्र कार्यकर्ते मुख्य प्रवाहात सामील झाल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समिती गणातील उभे असलेले उमेदवार सुशिक्षित आणि सुसंस्कृत असून जनसामान्यांप्रति निष्ठा ठेवून तळमळीने काम करणारे उमेदवार आहेत, या सर्व उमेदवारांच्या नावासमोरील तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन केले.*

*याप्रसंगी अजितराव पाटील (आप्पा) चिखलीकर, बाळासाहेब साळुंखे (चोरेकर), प्रणव ताटे, दत्तात्रय साळुंखे, धैर्यशील साळुंखे, निखिल साळुंखे, प्रसाद साळुंखे, सौ संगीता साळुंखे (माई), मानसिंगराव जगदाळे, पोपटराव साळुंखे, तानाजीराव साळुंखेसाहेब, सुहास बोराटे, सोमनाथ पवार, सुधाकर जाधव (आबा), प्रशांत यादव, दाजी पवार, संभाजी पिसाळ, ॲड. प्रमोद पुजारी, बाळासो माने, पांडुरंग चव्हाण, लहुराज जाधव, अशोक संकपाळ, मारुती बुधे, ॲड. सतीश यादव, शाहूराज पाटील, प्रकाश चव्हाण, मधुकर गायकवाड, संजय कदम, जनार्दन कदम, सुहास कदम, प्रतापराव माने, जयवंत साळुंखे, देवराज पाटील (दादा), भास्करराव गोरे, सर्जेराव खंडाईत, मानसिंगराव पाटील (काका), संजय गोरे, उत्तम गोरे, उद्धवराव फाळके, विष्णुपंत गोरे, दत्तात्रय दळवी (सर), मंगेश कुंभार, महेश पाटील, आप्पासो खंडाईत, मुकुंद खंडाईत, बाबालाल सुतार, शंभूराज काळभोर, जयवंत पाटील, दीपक शिंदे यांचेसह पाल, चरेगाव, उंब्रज, मसूर आणि कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील आणि त्या अंतर्गत सर्व पंचायत समिती गणातील उमेदवार ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Comments