हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेजचा शुभ चिंतन सोहळा संपन्न.विद्यार्थ्यांनी कॉलेज चे नाव उज्वल करावे - चेअरमन गोविंद भंडारे .
हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेजचा शुभ चिंतन सोहळा संपन्न.
विद्यार्थ्यांनी कॉलेज चे नाव उज्वल करावे - चेअरमन गोविंद भंडारे .
सातारा, दि.1- प्रा.अजय शेटे.
वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेज चे सन 2025- 26 च्या ई.12 वी बोर्ड परीक्षेचा शुभ चिंतन सोहळा बुधवार, दि.28 रोजी स.8.30 ते 11.30 या वेळेत शाळा संकुलात संप्पन्न झाला.
या वेळी विद्यादेवी श्री सरस्वती चे पूजन सर्व उपस्थित संचालक यांच्या हस्ते करण्यात आले.त्या नंतर सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओघवत्या निवेदन शैलीत प्रा.ज्योती पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.वासंती काळे यांनी करून,कार्यक्रमाचा उद्देश विषद केला.या नंतर अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपले भावनिक मनोगत व्यक्त केले.या नंतर ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. संदिप तिवाटणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून,विद्यार्थ्यांनी यशाचे ध्येय बाळगून यशस्वी व्हावे असे सांगितले.या नंतर प्रा.अजय शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त करून,कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार व कुलगुरू शिवाजीराव भोसले यांची शैक्षणिक कार्यातील प्रेरणादायी कथा सांगितली.या नंतर प्राचार्या भारती माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्या म्हणाल्या की,सर्व विद्यार्थ्यांनी जिद्द,चिकाटी ठेवून,अभ्यास करावा जीवनात उज्वल यश मिळवावे.या नंतर उपाध्यक्ष श्री.विजय म्हामणे यांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या डायस लेक्चर स्टँड चा स्विकार करून,आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की,सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्वल करावे.या नंतर चेअरमन गोविंद भंडारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ते म्हणाले की,विद्यार्थ्यांनी नेहमी प्रेरणादायी आदर्श समोर ठेवून,आपल्या जीवनात यशस्वी व्हावे.या नंतर त्यांनी मा.अजित दादा पवार यांच्या अचानक झालेल्या दुर्घटना ग्रस्त निधनाची दुःखद माहिती सांगून ,त्यांच्या राजकीय कारकिर्दी विषयी माहिती सांगितली व शाळा संकुलातर्फे शोक संदेश व्यक्त करून, सर्वांसमवेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या नंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक अशोक भंडारे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी त्यांची आठवण म्हणून,शाळेला खूप चांगली भेट वस्तू दिली.आजच्या कार्यक्रमाला निरोप समारंभ न म्हणता आपण आपण शुभ चिंतन कार्यक्रम म्हणतो,कारण आज जरी तुम्ही या शाळेतून शिक्षण घेवून, ई.12 वी ची परीक्षा देत आहात. त्यासाठी मी तुम्हाला शुभ चिंतन व्यक्त करतो.पण तुमचे शाळेशी असलेले नाते कायम ठेवा.
या कार्यक्रमाला सचिव सचिन काळे,शाळा समिती अध्यक्ष संतोष कांबळे,संचालक गजानन शेटे,अतिथी सुखदेव सिंह राजपुरोहित हजर होते.
कार्यक्रमाचे गोड आभार प्रदर्शन प्रा.प्रशांत कुलकर्णी यांनी व्यक्त करून, सर्वांप्रती ऋणनिर्देश व्यक्त केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक जे.टी.धुळप,पर्यवेक्षिका स्मिता जोशी,पर्यवेक्षक राजेंद्र जगदाळे,प्रा.शुभांगी पंडीत, प्रा.ज्योती कुलकर्णी, प्रा.राधिका डोंबे,प्रा.रविंद्र येलमर ,प्रा.निवास मगर यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाला ई.12 चे सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी , शाळा संकुलातील सर्व शिक्षक - शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग उपस्थित होते.
Comments
Post a Comment