सह्याद्रि”ने केले दैनंदीन 10200 मे.टनाचे गाळप टप्प्या टप्प्याने मशिनरींचा वापर करून प्रतिदिन 11000 मे. टन गाळप करणार. माजी मंत्री बाळासाहेब पाटील,चेअरमन


 

सह्याद्रिने केले दैनंदीन 10200 मे.टनाचे गाळप टप्प्या टप्प्याने मशिनरींचा वापर करून प्रतिदिन 11000 मे. टन गाळप करणार.  माजी मंत्री बाळासाहेब पाटील,चेअरमन


मसूर दि ०५:-  रवी वाकडे   

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने 7500 मे. टनावरून 11000 मे.टनापर्यंत गाळप करण्याकरीता नवीन विस्तारवाढ प्रकल्प नुकताच कार्यान्वित केला असून, या नवीन विस्तारवाढ प्रकल्पामधून आज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी दैनंदिन 10200 मे.टनाचे गाळप केले आहे. टप्प्या टप्प्याने नवीन विस्तारवाढ प्रकल्पातील मशिनरींचा वापर करून 11000 मे.टन व त्यापेक्षा जास्त दैनंदिन गाळप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी सहकार व पणन मंत्री मा.श्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

मा.श्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, सह्याद्रि कारखान्याच्या नवीन विस्तारवाढ प्रकल्पाला राजकीय, नैसर्गिक आणि तांत्रिक अडचणी आल्या, मात्र त्या सर्व अडचणींवर मात करून सह्याद्रिने आपली विस्तारवाढ पूर्ण केली. गेल्या आठ दिवसांपूर्वीच हा नवीन विस्तारवाढ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, आज प्रतिदिन 10200 मे.टनाचे गाळप करण्यात आले आहे. आदरणीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या प्रेरणेने कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांनी कारखाना ऊसाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा यासाठी कृष्णा आणि कोयना या कारखाना कार्यक्षेत्रातून बारमाही वाहणार्या नद्यांवर सहकारी तत्वावरील 16 मोठ्या जलसिंचन योजना उभारल्या. तसेच कांही बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना चालविण्यास घेतल्या.


 आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांनी हणबरवाडी-धनगरवाडी या योजनेचा पाया रचला, ही योजना पूर्णत्वास येण्यासाठी आपण जेष्ठ नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरद पवारसाहेब, स्व.अजितदादा पवार, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला, त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय अंगापूर, वाठार, किरोली, वेणेगांव, पेरले, भुयाचीवाडी कोणेगांव, तांबवे येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले. पुढे आरफळ कॅनॉलची निर्मिती झाली, शेतीला शाश्वत पाणी पुरवठा झाल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता वाढली, सभासदांच्या मागणीनुसार नवीन विस्तारवाढ प्रकल्प हाती घेतला, अनेक अडचणींवर मात करीत तो पूर्णत्वास येवून नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे. प्रतिदिन 10200 मे.टनाचे गाळप केले आहे. हे कारखान्याच्या आजवरच्या इतिहासातील उच्चांकी गाळप असून, टप्प्या टप्प्याने नवीन विस्तारवाढ प्रकल्पातील मशिनरींचा वापर करून 11000 मे.टन व त्यापेक्षा जास्त गाळप करण्यात येणार असून, त्यासाठी दैनंदिन गाळपक्षमतेस पुरेल एवढी ऊस तोडणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, असे सांगून नोंदविलेला संपूर्ण ऊस सह्याद्रिकडेच गळीतास पाठवावा असे आवाहन मा.श्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

 

Comments