हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज मध्ये ई.10 वी चा शुभ चिंतन सोहळा संप्पन्न.मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले ठेवून परीक्षेला सामोरे जावा- डॉ. हेमंत पेठे.
हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज मध्ये ई.10 वी चा शुभ चिंतन सोहळा संप्पन्न.मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले ठेवून परीक्षेला सामोरे जावा- डॉ. हेमंत पेठे.
सातारा,दि.17- प्रा.अजय शेटे.
वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालय मध्ये ई.10 वी बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन सोहळा सोमवार, दि.16 रोजी स.9.30 ते दु 12.30 या वेळेत पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका बी.एस.माने मॅडम यांनी करून, कार्यक्रमाचा उद्देश विषद केला.
या नंतर विद्यादेवी श्री सरस्वती चे पूजन करण्यात येवून,सर्व उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या नंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त करत, शाळेप्रती आपल्या सुहृद भावना व्यक्त केल्या.
या नंतर शिक्षक मनोगतात ज्येष्ठ शिक्षिका एस.एच.काळे मॅडम , ए .एम.राऊत सर पर्यवेक्षिका एस.पी.जोशी मॅडम, पर्यवेक्षक आर.एस.जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून, ई.10 वी चे अभ्यास तंत्र व भावी आयुष्यातील संधी या विषयी मार्गदर्शन करत उजाळा दिला.
या नंतर चेअरमन गोविंद भंडारे यांनी समुद्र्मंथनाची पौराणिक कथा सांगत,काय ग्रहण करावे हे कथन केले.या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.हेमंत पेठे यांनी परीक्षेला सामोरे जाताना मानसिक व शारीरिक आरोग्य तयारी करून,कसे यशस्वी व्हायचे याचे उत्तम शास्त्रीय मार्गदर्शन केले.
या वेळी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिलेल्या चार डायस लेक्चर स्टँड व एक चार्जिंग साऊंड सिस्टीम व पाच घड्याळे यांचा स्वीकार करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष विजय म्हामणे,सचिव सचिन काळे,व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष कांबळे,संचालक नितीन जाधव,संजय येवले,गजानन शेटे,शिक्षक प्रतिनिधी व्ही.टी.पवार ,मुख्याध्यापिका शितल पवार यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम. लहारे सर व एन.आर.जाधव मॅडम यांनी केले.आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक एस.एस.जामदार सर यांनी केले.सर्व शिक्षकांनी शाळेत झालेल्या नवीन सुधारणांचा विशेष उल्लेख केला.तसेच शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना नवीन रायटिंग पॅड व पेन बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक हजर होते.शेवटी अल्पोपहार वाटप करण्यात आला.
Comments
Post a Comment