राजकारणातील ' दादा ' गेले. महाराष्ट्र एका अभ्यासू नेत्याला पोरका झाला.
सातारा , दि.28- रवी वाकडे
महाराष्ट्र राज्याला आज सकाळी एक मोठा धक्का सहन करावा लागला.शांत,संयमी पण तेव्हढेच शिस्तबध्द आक्रमक नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले विद्यमान नेते मा.अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.त्यांचे विमान जळून खाक झाले आहे. मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे. तर विमान जळून खाक झालं आहे.
आज सकाळीच राज्याला हादरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. दादांन घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचं दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. महानगर पालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. हा अपघात नेमका कशामुळे झाला? तांत्रिक बाब काय ?या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे. अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेने सभेसाठी विमानाने रवाना झाले होते .एका छोट्या विमानाने अजित पवार नेहमीच प्रवास करत असत.आज देखील छोट्या विमानाने बारामती येथे लँडिंग करत होते. लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. एका शेतामध्ये विमान कोसळलं आहे. विमानात अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सिक्यू रिटी आणि पीए देखील विमानात होते. ते गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.समस्त कराड तालुका यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
Comments
Post a Comment