हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज मध्ये एनव्हॉइरमेंटल एज्युकेशन प्रोग्रॅम संप्पन्न.सामाजिक वनीकरण विभाग,सातारा यांचा उपक्रम.
हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज मध्ये एनव्हॉइरमेंटल एज्युकेशन प्रोग्रॅम संप्पन्न.सामाजिक वनीकरण विभाग,सातारा यांचा उपक्रम.
सातारा, दि.23 - प्रा.अजय शेटे.
सामाजिक वनीकरण विभाग,सातारा यांचे तर्फे बुधवार दि.21 रोजी, स .10.15 ते 11.45 या वेळेत वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये एनव्हायरमेंटल एज्युकेशन प्रोग्राम ,अंतर्गत व्याख्यान,स्लाईड शो,कार्यशाळा,विविध स्पर्धा,क्षेत्र भेटी आणि जंगल वाचन कार्यक्रमाची माहिती कु.श्वेता सुतार मॅडम , फ्रिलांस रिसर्च र, एम.इ.आर.आय.सातारा यांच्यातर्फे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना देण्यात आली.
यावेळी सामाजिक वनीकरण, वडूज कार्यालयाचे वनपाल सागर कुंभार , भरमाण्णा कोळी,आनंदराव चव्हाण यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमांतर्गत प्लास्टिक मुक्त परिसर,कचरा व्यवस्थापन, ई- कचरा व्यवस्थापन,जैव विविधता अभ्यासक्रम,पाणी बचत,जल व्यवस्थापन,ऊर्जा बचत,शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब,स्वच्छ्ता अभियान,पर्यावरणपूरक सन,सर्प विज्ञान, कीटक विश्व,मानव - वन्य जीव संघर्ष, वन वणवा,ध्वनी,वायू व मृदा प्रदूषण या बाबत सविस्तर माहिती सांगण्यात येवून, पी पी. टी.द्वारे चित्र फिती दाखविण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी वडूज शिक्षण विकास मंडळ सह प्राचार्या सौ .बी.एस.माने मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले.प्रकल्प समन्वयक श्री. एस.एस.जामदार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले.त्यांना सौ.आर.आर.गाडवे मॅडम व सौ.एस.एस.बागल मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या अनोख्या इको फ्रेंडली उपक्रमाचे पर्यवेक्षक जे.टी.धुळप,पर्यवेक्षिका सौ.एस पी.जोशी मॅडम,पर्यवेक्षक आर.एस.जगदाळे यांचे तर्फे व शाळा संकुल स्तरातून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले.या वेळी सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी ,शिक्षक - शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.
Comments
Post a Comment