हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सह वडूज मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न.


हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सह वडूज मध्ये  प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
सातारा, दि.27 - प्रा.अजय शेटे.
वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये  77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शाळा संकुलात नूतन चेअरमन गोविंद भंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष विजय म्हामणे,सचिव सचिन काळे,स्कूल कमिटी अध्यक्ष संतोष कांबळे ,विश्वस्त सतीश  शेटे, डॉ.हेमंत पेठे,अशोक भंडारे चंद्रकांत पंडीत,गजानन शेटे, प्रशांत शेटे,संजय येवले , डॉ.गिरीश जोशी, माजी प्राचार्य ए. पी .वाघमोडे,ए . टी.काळे,एस . डी.औटे,एम्.एस.गोडसे, एस.आर.जाधव, पत्रकार शेखर जाधव हजर होते.शाळा संकुलाच्या प्राचार्या बी.एस.माने मॅडम,पर्यवेक्षक जे. टी. धुळप, पर्यवेक्षिका एस. पी.जोशी मॅडम,पर्यवेक्षक आर .एस.जगदाळे, शितल शिंदे मॅडम यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.
यावेळी ध्वजारोहण कार्यक्रम झाल्या नंतर राष्ट्रगीत,सलामी,महाराष्ट्र गीत गायन होऊन संगीत कवायत कार्यक्रम , राष्ट्रप्रेमी भाषणे , संविधान ,साक्षरता व कॉपी मुक्त परीक्षा प्रतिज्ञा शपथ असा कार्यक्रम झाला.या नंतर संपूर्ण गावात वाद्यवृंदासह  प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी देशप्रेम पर घोषणा दिल्या.नागरिकांनी पण सर्वत्र रांगोळ्या काढून व देशप्रेम पर संगीत गाणी ऐकवत प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात साजरा केला.

नंतर सर्व जण तहसील कार्यालय, वडूज येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी हजर राहिले.तेथे खटाव तालुक्याच्या तहसीलदार मा. बाई माने मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येवून संविधान शपथ प्रतिज्ञा घेण्यात आली.यावेळी मतदान जागृती कार्यक्रम अंतर्गत  पथ नाटय नाटिका सादर करण्यात येवून,संगीत कवायत सादर करण्यात आल्या.तसेच स्वातंत्र्य वीर उत्तराधिकारी व आणीबाणी राजकैदी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या नंतर सर्वांचे उपस्थित सर्व कार्यालयाचे अधिकारी यांच्या बरोबर फोटो सेशन करण्यात आले.यावेळी डी. वाय.एस. पी.रणजित सावंत व वडूज चे पी.आय.घनशाम सोनवणे साहेब यांनी चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाला नायब तहसीलदार महेश गायकवाड , सुनिल जाधव , गट शिक्षणाधिकारी सोनाली विभुते मॅडम तसेच पंचायत समिती,नगर पंचायत,भूमी अभिलेख,कृषी कार्यालय, सहाय्यक निबंधक,दुय्यम निबंधक कार्यालय, सर्व शाळा स्टाफ,विद्यार्थी - विद्यार्थिनी सह गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर नागरिक हजर होते.

Comments