संगीत साधना ग्रुप चा अभंग वाणी कार्यक्रम संप्पन्न.स्वरकुशल गायकांनी केला संगीतमय भक्ती स्वरांचा वर्षाव


संगीत साधना ग्रुप चा अभंग वाणी कार्यक्रम संप्पन्न.स्वरकुशल गायकांनी केला संगीतमय भक्ती स्वरांचा वर्षाव.
सातारा, दि.22 - प्रा.अजय शेटे.
वडूज येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे औचित्य साधून,संगीत साधना ग्रुप, वडूज यांच्या वतीने श्रवणीय संगीत अभंग वाणी व भक्ती गीत गायनाचा सुश्राव्य कार्यक्रम रविवार दि.18 जानेवारी 2026 रोजी दु.12.30 वा.श्री गणेश मंदिर सभामंडपात मोठ्या उत्साहात संप्पन्न झाला.
या वेळी सर्व स्त्री - पुरुष गायकांनी सुगम संगीतमय स्वरांचा वर्षाव करत सर्व श्रोत्यांना भक्ती रसाची श्रवणीय अनुभूती मिळवून दिली.
या कार्यक्रमात ॲड.अनिल गोडसे, आलम काझी,रियाज मुल्ला,उमेश घाडगे, अभय देशमुख, डॉ.चंद्रशेखर नांगरे,अनिल खडके,नितीन लंगडे, डॉ.वैभव व विनोद भंडारे,शशी बागेकरी, सौ. विनया तिडके, कु.मधुरा शहा, डॉ.नूतन फडणीस,गौरी भंडारे, डॉ.श्रावणी जोशी, शितल शिंदे,लता बागल, सुलभा व पुष्पा शिंदे, डॉ.प्राजक्ता काटकर, रंजना माई गोडसे,सुजाता इंगळे, डॉ.उज्वला जाधव मॅडम इत्यादी प्रतिथयश 24 गायकांनी आपली गायन भक्ती कला सादर केली.

यावेळी वडूजकर व पंच क्रोशितील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments