वडूज मध्ये वीरशैव लिंगायत समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळावा होणार
सातारा, दि.21 -प्रा.अजय शेटे.
लिंगायत वधू - वर शिवमूर्ती ग्रुपच्या सहकार्याने वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथे रविवार दि.1फेब्रुवारी ,2026 रोजी स.10 ते संध्या.4 वाजेपर्यंत पंचरत्न मंगल कार्यालय, पुसेगाव रोड, वडूज येथे राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे आयोजक वीरशैव लिंगायत समाज संघटना, वडूज व शिवमूर्ती लिंगायत विनामूल्य सामाजिक वधू - वर उपक्रम केंद्र , विटा हे असून, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मायणी अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन व मा.जि.प.सदस्य मा.सुरेंद्र मोहनराव गुदगे दादा यांची असणार आहे. या मेळाव्याचे संपर्क प्रमुख म्हणून श्री.श्रीकांत विठ्ठल म्हामणे उर्फ बंडा काका ,संपर्क क्रमांक 9960028173 हे काम पाहणार आहेत.
या वधू - वर मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून,श्री. अच्युत दुगमे 9423256611, सौ. शांता बाई अ.दुगमे 9130769308, रेश्मा जवळे मॅडम ,पंढरपूर 915696118, मिनाक्षी मगदूम,सांगली 9130071155,राजाराम तेलसिंगे, कुपवाड 9552485039, अनिता दड्डी मॅडम,मिरज,नंदकुमार घोंगडे, दिघंची,रविराज शेटे,पत्रकार सांगोला,अमोल मल्हारे ,बारामती,संतोष कोरे धामणी,निर्मला बारवडे,सातारा,मल्लिकार्जुन पाचछापुरे,इचलकरंजी,किशोर तोडकर,कोल्हापूर 9420008431,शिवकुमार करोशी,निपाणी,9035220612,महादेव लोखंडे, विटा 966038 8687,विजयकुमार ठिगळे ,विजय कोरे, विटा, आप्पा खुजट, हातनुर,वासंती महापरळे,सातारा,हे काम पाहणार आहेत. हा मेळावा लिंगायत समाजातील सर्व 70 जाती व 350 पोट जातींसाठी आहे.याच बरोबर प्रथम वधू - वर यांच्यासह ,अपंग,दिव्यांग,विधवा,विदुर, घटस्फोटित,अल्प व उच्च शिक्षित,श्रीमंत,मध्यमवर्गीय यांच्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे कार्यवाहक श्री. सतीश शेटे, सोमनाथ येवले,संजय येवले,दत्तात्रय गाडवे,जयवंत एखांडे, राहूल म्हामणे,सचिन शेटे,अमित गाडवे,विशाल टाकणे,सत्यजित तोडकर,सागर म्हामणे,बसवेश्वर गाडवे,केदार तोडकर, चैतन्य म्हामणे यांच्यासह सर्व समाज बांधव आहेत. नाव नोंदणी करणाऱ्या सदस्यांनाच व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील करण्यात येईल.त्यासाठी वरील नंबरवर मेसेज करावा.त्यावर बायोडाटा व फोटो पाठवता येईल.या मेळाव्याची फाईल तयार करण्यात येणार आहे.यावेळी सर्व वधू - वर यांची मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. वधू - वर असल्या शिवाय पालकांना प्रवेश उपलब्ध नाही.फक्त त्यांची नोंद करून घेण्यात येईल.तरी सर्वांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
.jpg)


Comments
Post a Comment