नांदेड शहरात आज नव्या 2 रुग्णांची भर, एकूण आकडा 127 वर नांदेड,दि २४ राजेश एन भांगे

*नांदेड शहरात आज नव्या 2 रुग्णांची भर, एकूण आकडा 127 वर*
*नांदेड,दि २४ ; राजेश एन भांगे*
नांदेड शहरातील रविवार दिनांक 24 मे  2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 2 अहवाला पैकी नवीन 2 रुग्णांच्या स्वाब हे पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 127 वर पोहोचली आहे. 
 आता प्राप्त झालेल्या 2 पॉझिटिव रुग्णांपैकी 1 रुग्ण शिवाजीनगर भागातील तर 1 रुग्ण विवेक नगर भागातील आहे. दोन्ही रुग्ण पुरुष असून अनुक्रमे (वय वर्ष 61व 40) आहे. या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 2 पॉझिटिव रुग्णांची भर
☑️ दिवसभरात 4 रुग्णांना सुट्टी
☑️ एकूण रुग्ण संख्या 127वर.
☑️ आतापर्यंत 59 बरे होऊन घरी 
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️6 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️62 रुग्णांवर उपचार सुरू.


दरम्यान नागरिकांनी सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Comments