वडूज मध्ये वटपौर्णिमा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी


वडूज मध्ये वटपौर्णिमा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी

वडूज दि 29 :- मिलिंदा पवार
 आज राज्यभरात वटपौर्णिमा उत्साहात आणि भक्ती मे वातावरणात साजरी केली जात आहे विवाहित महिलांनी पतीचा दीर्घायुष उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करून व्रताचे पालन केले सकाळपासूनच मंदिर परिसरात आणि वडाच्या झाडांजवळ महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली पारंपारिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी पूजा ,आरती आणि प्रदक्षिणा घालत वडाच्या झाडाला पवित्र दोरा बांधला यावेळी सावित्री सत्यवान यांच्या अखंड निष्ठा प्रेम आणि समर्पणाच्या कथेचे स्मरण करण्यात आले.
वटपोर्णिमा हा सण केवळ धार्मिक परंपरा नसून कुटुंबातील प्रेम विश्वास आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारा सण म्हणूनही ओळखला जातो.अखंड सौभाग्याचे प्रतीक असणारा हिंदू धर्मामधील महत्त्वाचा सण जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.
निसर्गतः दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड ,पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारले असावी एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याचे सहसा तोड होत नाही.
हिंदू संस्कृतीचे जतन करण्याचा संदेशही या निमित्ताने दिला जात आहे व अतिशय भक्तिमय आणि उत्साही वातावरणात वटपौर्णिमेचा हा सण सर्वत्र साजरा केला गेला.

Comments