तेजस्विनीताई घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली 'नो ऑईल, नो गॅस' कार्यशाळा उत्साहात


तेजस्विनीताई घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली 'नो ऑईल, नो गॅस' कार्यशाळा उत्साहात.
कराड दि  19 :- रवी वाकडे
तेजस्विनीताई घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली 'नो ऑईल, नो गॅस' कार्यशाळा उत्साहात
 महिलांच्या सक्षमीकरणासाठी तेजस्विनीताई घोरपडे यांचा अभिनव उपक्रम; 'नो ऑईल, नो गॅस' पाककृती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद



भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला मोर्चा सातारा जिल्हाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली 'नो ऑईल, नो गॅस' पाककृती कार्यशाळा सातारा येथील भाजपा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

भाजपा महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्षा सौ. तेजस्विनीताई घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत तेल व गॅसचा वापर न करता पौष्टिक, चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ कसे तयार करता येतात, याचे प्रात्यक्षिक महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रात कार्यरत महिलांनी सादर केले.

या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील महिला डॉक्टर, इंजिनीयर, गृहिणी, बचत गटातील महिला तसेच भाजपा पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिलांमध्ये आरोग्यदायी आहाराबाबत जनजागृती करण्याबरोबरच त्यांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा अभिनव उपक्रम ठरला.

उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्षा सौ. तेजस्विनीताई घोरपडे यांनी सांगितले की, "निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज घडविण्यात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या जीवनशैलीत आरोग्यदायी आहाराला प्राधान्य देणे ही काळाची गरज असून, कमी खर्चात आणि तेल व गॅसचा वापर टाळूनही पौष्टिक व स्वादिष्ट पदार्थ तयार करता येतात. अशा उपक्रमांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळते आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचतो."

यावेळी सातारा बाह्य मंडल अध्यक्षा वैशालीताई टंगसाळे, नगरसेविका रीनाताई भणगे, शहराध्यक्षा नंदाताई इंगवले यांच्यासह जिल्हा व मंडल स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हाध्यक्षा तेजस्विनीताई घोरपडे यांच्या पुढाकारातून आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी तेजस्विनीताई घोरपडे सातत्याने कार्यरत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला मोर्चा सातारा जिल्हा विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

Comments