अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवस रद्द; २६ मे रोजी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसणार.
अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवस रद्द; २६ मे रोजी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसणार.
कराड 24 :- रवी वाकडे
अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवस रद्द; २६ मे रोजी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसणार
कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आमदार मनोजदादा घोरपडे युवा मंच व भारतीय जनता पार्टी कराड उत्तर यांच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे तसेच जगामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दिनांक 26 मे रोजी होणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.
यासंदर्भात सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आमदार मनोजदादा घोरपडे युवा मंच कराड उत्तर यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच दिनांक 26 मे रोजी आमदार मनोजदादा घोरपडे हे बाहेरगावी असल्यामुळे शुभेच्छा स्वीकारण्यासाठीही उपलब्ध असणार नाहीत.त्यामुळे सर्व स्नेही, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार मनोजदादा घोरपडे युवा मंच व भारतीय जनता पार्टी कराड उत्तर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment