सह्याद्रि"च्या वतीने दिनांक 26 रोजी वाठार (की) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन

          

 सह्याद्रि"च्या वतीने दिनांक 26 रोजी वाठार (की) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन 



 यशवंतनगर  दि. 24 :-  रवी वाकडे

       सह्याद्रि"च्या वतीने दिनांक 26 रोजी वाठार (की) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन.  सह्याद्रि सहकारी साखर कारखाना आणि नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, कारखान्याचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता कारखाना कार्यक्षेत्रातील वाठार (की) ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी श्री संत तुकाराम महाराज सभागृहात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याप्रसंगी नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि.चे मध्य व उत्तर भारत ऍग्रोनोमी हेड श्री अरुण देशमुख यांचे ऊस उत्पादन वाढीमध्ये ठिबक द्वारे खत व पाणी व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.




या शेतकरी मेळाव्यास पंचक्रोशीतील ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद, ग्रामस्थ बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सह्याद्रि सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments